सातारा - एकाच दिवशी जिल्ह्यातील दहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यातील दोघांचा अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आला आहे.
साताऱ्यात दहा नागरिकांना कोरोनाची बाधा; दोघांचा मृत्यूनंतर अहवाल 'पॉझिटिव्ह' - satara corona updates
एकाच दिवशी जिल्ह्यातील दहा जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यातील दोघांचा अहवाल मृत्यूपश्चात पॉझिटिव्ह आला आहे.
खंडाळा तालुक्यातील आसवलीत राहणाऱ्या 60 वर्षाच्या पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, वाई तालुक्यातील पसरणीत वास्तव्यास असणाऱ्या 75 वर्षाच्या पुरुषाचा राहत्या घरी मृत्यू झालाय. ते मुंबईहून परतल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमोद गडीकर यांनी दिली आहे. खंडाळ्यातील व्यक्तीचा संजीवनी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला असून त्याला सारीचा आजार होता. यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 631 वर गेली असून आजवर 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 331 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये वाई- पसरणी येथील 75 वर्षीय पुरुष (मृत) व सोमेश्वरवाडी येथील 68 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच खटाव तालुक्यातील पाचवड येथील 30 वर्षांचा पुरुष व विसापूरातील 71 व 62 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जावली काळोशी येथील 39 वर्षीय महिला व प्रभुचीवाडीतील 28 व 26 पुरुष आणि 50 वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे.
पुण्यातील एन.सी.सी.एस. कडून रात्री उशिरा प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार 181 जणाचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलीय.