महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने कोरोना रुग्णांसाठी 110 बेडची सोय - Covid center in karad

कराडमधील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये 50, वडगाव हवेली प्राथमिक आरोग्य केूंद्र आणि उंडाळे ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी 30, अशा एकूण 110 बेडची सोय झाली आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने कोरोना रुग्णांसाठी 110 बेडची सोय
पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने कोरोना रुग्णांसाठी 110 बेडची सोय

By

Published : May 9, 2021, 12:04 PM IST

कराड (सातारा)- माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने कराड तालुक्यातील रुग्णांसाठी 110 बेड उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये कराडमधील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये 50, वडगाव हवेली प्राथमिक आरोग्य कें्द्र आणि उंडाळे ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी 30, अशा एकूण 110 बेडची सोय झाली आहे.

आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी वाढीव बेडच्या व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, तालुका वैद्यकीय अधिकारी, संगीता देशमुख उपस्थित होत्या.

कोरोना ही महाभयानक महामारी आहे. अशी महामारी शंभर वर्षांपूर्वी आली होती. ज्याला आपण स्पॅनिश फ्लू नावाने ओळखतो. त्यावेळी हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. कोरोना ही तशीच महामारी असून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा मुकाबला केला, तरच टिकाव लागेल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

देशातील यंत्रणा ढिली पडली

भारताने पहिल्या टप्प्यात कोरोनावर कशी मात केली, याचा बडेजाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मारला. त्यामुळे आपल्या देशातील यंत्रणा ढिली पडली आणि आता उद्भवलेल्या दुसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यास आपण कमी पडलो. तथापि, आता प्रशासनासह राज्य सरकारने कंबर कसली असून सर्वांचे लसीकरण होणे तितकेच गरजेचे असल्याचेही चव्हाण म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details