साताऱ्यात 186 नवे पॉझिटिव्ह; 67 नागरिकांना डिस्चार्ज, तर तिघांचा मृत्यू
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 186 नागरिक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या 4 महिन्यांतील हा सर्वात मोठा आकडा आहे. बाधितांच्या संख्येने साडेतीन हजाराचा पल्ला पार केला असून उपचार घेणा-या रुग्णांची संख्या 1 हजार 540 वर गेलीय.
सातारा - विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 186 नागरिक बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या 4 महिन्यांतील हा सर्वात मोठा आकडा आहे. बाधितांच्या संख्येने साडेतीन हजाराचा पल्ला पार केला असून उपचार घेणा-या रुग्णांची संख्या 1 हजार 540 वर गेलीय. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी अधिक माहिती दिली. आज 67 नागरिकांना दहा दिवसांनंतर घरी सोडण्यात आले असून 597 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
वाई तालुक्यातील परखंदी येथील एक पुरुष व सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली तसेच सेनगाव येथील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ.गडीकर यांनी दिली. जिल्ह्यातील 597 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 26 हजार 512 नमुने घेण्यात आले आहेत. त्यातील 3 हजार 338 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज अखेर 1 हजार 865 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडा 119 झाला असून 1 हजार 354 रुग्ण उपचार घेत आहेत.