सातारा - जिल्ह्यात गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 1 हजार 184 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 22 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या 610 नागरिकांना घरी सोडण्यात आले.
22 कोरोनाबाधितांचा मृत्यू
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे जुनखेड (ता. सातारा) येथील 65 वर्षीय पुरुष, मांडवे (ता. सातारा) येथील 65 वर्षीय पुरुष, जरेवाडी (ता. सातारा) येथील 64 वर्षीय महिला व खासगी हॉस्पीटलमध्ये कामेरी (ता. सातारा) येथील 81 वर्षीय महिला, चिंचणेर (ता. सातारा) येथील 70 वर्षीय महिला, प्रतापगंज पेठेतील 70 वर्षीय पुरुष, व्यंकटपुरा पेठेतील 76 वर्षीय महिला यांचा मृत्यू झाला आहे. तर करंजे येथील 84 वर्षीय पुरुष, गोंदवले (ता. माण) येथील 37 वर्षीय पुरुष, आणेवाडी (ता. जावली) येथील 44 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील 76 वर्षीय महिला, राजेवाडी (ता. खंडाळा) येथील 58 वर्षीय पुरुष, बावधन (ता. वाई) येथील 70 वर्षीय पुरुष, तारुख (ता. कराड) येथील 80 वर्षीय पुरुष, औंध (ता. खटाव) येथील 63 वर्षीय पुरुष, वडुज (ता. खटाव) यांचा मृत्यू झाला आहे. येथील 37 वर्षीय पुरुष, हडपसर (जि. पुणे) येथील 60 वर्षीय महिला, येवडेवाडी (पुणे) येथील 48 वर्षीय पुरुष, कराड येथील 90 वर्षीय महिला, ओगलेवाडी (ता. कराड) येथील 74 वर्षीय पुरुष, रविवार पेठ फलटण येथील 53 वर्षीय पुरुष, शिरवळ (ता. खंडाळा) येथील 70 वर्षीय पुरुष अशा एकूण 22 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा-'सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर टीका करणारे भाजपा नेते दळभद्री'
चित्रीकरणावर बंदी
जिल्ह्यामध्ये यापूर्वी वेगवेगळ्या आदेशान्वये चित्रपट, लघुपट, वेबसिरीज व इतर सर्व प्रकारच्या चित्रिकरणास परवानगी देण्यात आलेली होती. आपत्ती व्यवस्थान प्राधिकरणाचे जिल्हाध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ते सर्व आदेश रद्द केले आहेत. यापुढे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या चित्रपट, लघुपट, वेबसिरीज व सर्व इतर प्रकारच्या चित्रिकरणावर पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ बंदी घातली आहे.
हेही वाचा-...तर सविनय कायदेभंग करून रेमडेसिवीर महाराष्ट्रात वाटू - प्रवीण दरेकर
जिल्ह्यातील सद्यस्थिती
एकूण नमुने - 4 लाख 55 हजार 904
एकूण बाधित - 77 हजार 524
घरी सोडण्यात आलेले - 65 हजार 531
मृत्यू -2 हजार 28
उपचारार्थ रुग्ण - 9 हजार 965