माण (सातारा) -तालुक्यातील कुकुडवाड(कारंडेवाडी) येथे घरगुती वादातून पुतण्यानेच काकाची हत्या केल्याची घटना घडली. ही घटना आज (मंगळवारी) समोर आली आहे. लक्ष्मण चव्हाण असे मृताचे नाव आहे. तर आरोपी पुतण्याचे नाव संदीप वसंत चव्हाण आहे.
मृत लक्ष्मण चव्हाण आणि आरोपी संदीप वसंत चव्हाण आणि त्याचे वडील वसंत चव्हाण हे सर्वजण एकाच कुटुंबात राहत होते. यातील मृत आरोपी यांच्यात सतत दारू पिऊन त्यांच्यात अनेक वेळा मारहाण झाली होती. रात्री सर्वजण जेवण करून झोपली असता संदीप याने दारूच्या नशेत घरासमोर झोपलेल्या आपल्या चुलत्याच्या गळ्यावर सुरीने वार करून तेथून पळ काढला. लक्ष्मण यांना खोलवर जखम झाल्याने रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला.