महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवभोजन थाळीचा गोरगरिबांनी लाभ घ्यावा; उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांचे आवाहन

देशात, राज्यात असलेला लॉकडाऊन व संचारबंदी तसेच जमावबंदी आदेश असल्याने गरजू, गोरगरीब, मोलमजुरी करुन हातावर पोट असलेल्या लोकांची उपासमार होऊ नये, यासाठी १० रुपये किंंमत असणारी शिवभोजन थाळी आता प्रत्येक केंद्रातून फक्त 5 रुपयात मिळणार आहे.

By

Published : Apr 4, 2020, 10:25 AM IST

needy people should eat shivbhojan thali
शिवभोजन थाळीचा गोरगरिबांनी लाभ घ्यावा; उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांचे आवाहन

सातारा- कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाला देश आज धैर्याने व संयमाने सामोरे जात आहे. देशात, राज्यात असलेला लॉकडाऊन व संचारबंदी तसेच जमावबंदी आदेश असल्याने गरजू, गोरगरीब, मोलमजुरी करुन हातावर पोट असलेल्या लोकांची उपासमार होऊ नये, यासाठी १० रुपये किंंमत असणारी शिवभोजन थाळी आता प्रत्येक केंद्रातून फक्त 5 रुपयात मिळणार आहे.गरजू, गोरगरिबांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले.

गरजू,गोरगरीब,हातावर पोट असणाऱ्या तसेच मोलमजुरी करणाऱ्या लोकांसाठी नवीन एसटी स्टँडवरील एसटी कँटीन,जूना स्टँडवरील त्रिमूर्ती हाँटेल आणि तहसील कार्यालयाजवळ या शहरातील महत्त्वाच्या तीन ठिकाणी शिवभोजन थाळी योजना केंद्र सुरु करण्यात आले आहे. प्रत्येक शिवभोजन थाळी केंद्रातून सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत दोन चपाती, भाजी, भात, वरण असा आहार असलेल्या ५० शिवभोजन थाळ्या फक्त पाच रुपयात मिळणार असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तांबे यांनी केले.

पाटण येथील नवीन एसटी स्टँडवरील एसटी कँटीनमध्ये सुरु केलेल्या शिवभोजन थाळी योजना केंद्राची शुभारंभ श्रीरंग तांबे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी तहसिलदार समीर यादव ,विलासराव थरवल व अतूल थरवल आदी मान्यवर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details