महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gram panchayat Election शंभूराज देसाई गटाला धक्का, खासदार श्रीनिवास पाटलांच्या गावात पुन्हा राष्ट्रवादी - मारूल हवेली गावात राष्ट्रवादीचा चौथ्यांदा विजय

मारुल हवेली गावातील ग्राम पंचायत निवडणुकीत ( Satara Gram Panchayat Election ) राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील ( MP Srinivas Patil ) यांच्या गटाने सलग चौथ्यांदा विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीने मारुल हवेली ग्राम पंचायत निवडणुकीत पालकमंत्री शंभुराज देसाईंना ( Guardian Minister Shambhuraj Desai ) धक्का दिला आहे. शंभुराज देसाई यांनी ही प्रतिष्ठेची ग्राम पंचायत जिंकण्यासाठी मातब्बर उमेदवार दिला होता. मात्र श्रीनिवास पाटलांच्या सुपूत्राने आखलेल्या रणनितीने राष्ट्रवादीला ( Nationalist Congress Party Won ) मारुल हवेली ग्राम पंचायतीत सलग चौथ्यांदा विजय मिळवणे शक्य झाले.

Satara Gram Panchayat Election
खासदार श्रीनिवास पाटील

By

Published : Dec 20, 2022, 3:30 PM IST

सातारा -पाटण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि खासदार श्रीनिवास पाटील ( MP Srinivas Patil ) यांचे गाव असलेल्या मारूल हवेली ग्रामपंचायत ( Satara Gram Panchayat Election ) निवडणुकीत राष्ट्रवादीने ( Nationalist Congress Party Won ) सलग चौथ्यांदा झेंडा फडकवला आहे. सरपंच पदासह ८ जागांवर विजय मिळवत उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई ( Guardian Minister Shambhuraj Desai ) गटाला धक्का दिला आहे.

खासदार पुत्राची रणनिती यशस्वीखासदार श्रीनिवास पाटील ( MP Srinivas Patil ) यांचे सुपूत्र आणि राष्ट्रवादीच्या माहिती-तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल रिंगणात होते. विरोधात पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या ( Guardian Minister Shambhuraj Desai ) गटाने मातब्बर निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र राष्ट्रवादीने सरपंचपदाच्या उमेदवारासह ८ जागांवर विजय मिळवला, तर पालकमंत्री शंभूराज देसाई ( Guardian Minister Shambhuraj Desai ) गटाला केवळ चार जागांवर विजय मिळविता आला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार आक्का जगन्नाथ मस्के या सरपंचपदी मताधिक्याने निवडून आल्या आहेत.

राष्ट्रवादीने सलग चौथ्यांदा मिळवली सत्तामारूल हवेली हे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील ( MP Srinivas Patil ) यांचे गाव आहे. या गावात शंभुराज देसाई ( Guardian Minister Shambhuraj Desai ) यांचेही प्राबल्य आहे. श्रीनिवास पाटील यांच्या गटाच्या विरोधात पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी मातब्बर उमेदवार दिला होता. मात्र खासदार पाटलांच्या सुपूत्राच्या रणनितीमुळे ही जागा सलग चौथ्यांदा राष्ट्रवादीला ( Nationalist Congress Party Won ) राखता आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details