महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलची सत्ता; चार जागांवर अपक्षांचा शिरकाव - सातारा बँक निवडणूक

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Satara DCC Bank Election) पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलने २१ पैकी १७ जागा जिंकत सत्ता कायम ठेवली आहे. तर चार जागांवर अपक्षांनी शिरकाव केला आहे.

Satara DCC Bank Election
सातारा जिल्हा बँक

By

Published : Nov 23, 2021, 8:57 PM IST

Updated : Nov 23, 2021, 10:17 PM IST

सातारा - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Satara DCC Bank Election) पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनलने २१ पैकी १७ जागा जिंकत सत्ता कायम ठेवली आहे.

शिवेंद्रसिंहराजे भोसले
  • सहा जागांवर सहकार पॅनल -

जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी अकरा जागा यापूर्वीच सहकार पॅनलने बिनविरोध करत वर्चस्व मिळवले होते. उर्वरित दहा जागांसाठी रविवारी मतदान झाले. जिल्ह्यातील ११ तालुक्यामधून ९६ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान जावळी, खटाव या दोन तालुक्यातून १०० टक्के मतदान झाले. बहुतांश तालुक्यांमधून ९० टक्‍क्‍यांच्यावर मतदान झाले. जिल्ह्यातील एकूण १ हजार ९६४ मतदारांपैकी १ हजार ८९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी सातारा येथील नागरी बँक असोसिएशनच्या सभागृहामध्ये मतमोजणी पार पडली.

  • पाटणमधून धक्कादायक निकाल -

दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सहा जागा सहकार पॅनलला मिळाल्या. तर चार जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे. कराड सोसायटी मतदार संघामध्ये सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा पराभव करत या मतदारसंघावर वर्चस्व मिळवले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण सोसायटी मतदारसंघातून नशीब आजमावले; परंतु त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार सत्यजीतसिंह पाटणकर यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

  • गोरे-खत्री यांना चिठ्ठीमुळे संधी -

माण सोसायटी मतदारसंघातून शेखर गोरे आणि मनोज पोळ यांना प्रत्येकी ३६ पडली. कोरेगाव सोसायटी मतदार संघात सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक यांना प्रत्येकी ४५ मते पडली. दोन्ही ठिकाणी उमेदवारांना समसमान मते पडल्याने निकाल राखून ठेवण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते दोन्ही मतदारसंघांमध्ये चिठ्ठी काढली. शिवसेनेचे शेखर गोरे आणि सुनील खत्री यांना या चिठ्ठीने साथ दिल्याने ते विजयी ठरले.

  • निकालाचे हाय लाईटस् -

- माजी मंत्री व राष्ट्रवादीचे हेविवेट नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा अपक्ष उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी अवघ्या एका मताने पराभव
- खटाव सोसायटी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारले होते. मात्र या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक नंदकुमार मोरे यांचा घार्गे यांनी दारुण पराभव केला.
- माण सोसायटी मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे शेखर गोरे विजयी
- कोरेगाव सोसायटी मतदार संघात राष्ट्रवादीचे शिवाजीराव महाडिक यांचा पराभव करून सुनील खत्री विजयी
- इतर मागास प्रवर्गातून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व विद्यमान संचालक प्रदीप विधाते विजयी
- नागरी बॅंका पतसंस्था मतदारसंघांत रामभाऊ लेंभे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुनील जाधव यांचा पराभव केला.
- महिला राखीवच्या दोन जागांवर सहकार पॅनलचा विजय. या ठिकाणी कांचन साळुंखे आणि ऋतुजा पाटील यांनी विजय मिळवला आहे.

हेही वाचा -सातारा जिल्हा बँक निवडणूक : सहकार मंत्र्यांची बाजी, गृहराज्यमंत्री पराभूत

Last Updated : Nov 23, 2021, 10:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details