सातारा- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंडातात्या कराडकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून ( NCP protest against Bandatatya Karadkar controversy ) निषेध केला. कराडकर यांनी आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते.
कराडमधील मठात बंडातात्या लहानाचे मोठे झाले. त्याच मठाच्या पायर्यांवर बंडातात्यांविरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले. त्यामुळे वारकरी सांप्रदायातील सेवेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, बंडातात्यांच्या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटल्याने ते अडचणीत ( Reactions after Bandatatya Karadkars statement ) आले आहेत.
हेही वाचा-Lata Mangeshkar health : लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली, पुन्हा व्हेंटिलेटरवर
प्रतिकात्मक प्रतिमेला मारले जोडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंडातात्या कराडकरांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. बंडातात्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारण्यात आले. बंडातात्यांचा निषेध असो, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. तसेच त्यांच्या प्रकाश जंत्रे या मूळ नावाने ( Bandatatya original name Prakash Jantre ) निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार बटाणे ( Nandkumar Batane slammed Bandatatya Karadkar ) म्हणाले, की दीडशे वर्षाची पंरपरा असणार्या कराडकर मठात बंडातात्या लहानाचे मोठे झाले. मात्र, कराडकर मठातील संस्कार ते विसरले. वास्तविक त्यांनी सांप्रदायावर बोलायला हवे होते. परंतु, ते राजकीय नेत्यांवर बोलले. स्वत:ला प्रसिद्धी झोतात आणण्यासाठीच त्यांनी अशी वक्तव्ये केली आहेत, असा आरोप नंदकुमार बटाणे यांनी केला.