नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सकाळी त्यांनी आपला राजीनामा सपूर्द केला. ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
हेही वाचा -'मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही', उदयनराजेंच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून या वृत्ताचे खंडन करण्यात येत होते. दोनच दिवसांपूर्वी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उदयनराजे कोठेही जाणार नाहीत, ते राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगितले होते. त्या अगोदरही खासदार अमोल कोल्हेंसह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अखेर उदयनराजेंनी काल भाजपमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर केला असून ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
हेही वाचा -मजबूत विरोधी नेत्यांचीही महाराष्ट्राला गरज, राजे भाजपात जाऊ नका - राजू शेट्टी