महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Patankar On Shambhuraje : तुम्ही मंत्रिपद देणाऱ्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला, सत्यजित पाटणकरांचा शंभूराजेंवर हल्लाबोल - Patankar slamed minister Shambhuraje Desai

मंत्री शंभूराजे देसाई (minister Shambhuraje Desai) हे मंत्रिपद देणाऱ्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून बंडात सहभागी झाले आहेत असा हल्लाबोल ( Patankar slamed minister Shambhuraje Desai) राष्ट्रवादीच्या सत्यजितसिंह पाटणकरांनी (NCP leader Patankar) केला. कोणी कुठेही जाऊ द्या, आपण मात्र खोके देणाऱ्यांच्या मागे कधीही जाणार नाही असा टोला त्यांनी लगावला.

Satyajit Patankar
सत्यजित पाटणकर

By

Published : Sep 27, 2022, 7:49 PM IST

सातारा :मंत्री शंभूराजे देसाई (minister Shambhuraje Desai) हे मंत्रिपद देणाऱ्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून बंडात सहभागी झाले आहेत असा हल्लाबोल राष्ट्रवादीच्या सत्यजितसिंह पाटणकरांनी केला. कोणी कुठेही जाऊ द्या, आपण मात्र खोके देणाऱ्यांच्या मागे कधीही जाणार नाही असा टोला त्यांनी लगावला. ते पाटणमधील विकासकामांच्या भुमीपूजन कार्यक्रमात बोलत होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः शंभूराजेंना लाल दिवा दिला, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद दिले मात्र त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून हे महाशय बंडात सहभागी झाले, असा आरोपही ( Patankar slamed minister Shambhuraje Desai) त्यांनी केला आहे.

पराभवाने खचलो नाही :पाटणकर म्हणाले की, मी पराभवाने खचून न जाता गेले सात ते आठ वर्षे ग्रामपंचायती, नगरपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद गटातील जागा जिंकून आणल्या. आमदार नव्हतो तरी मी घरात बसलो नाही. अथवा पाटण तालुका सोडून बाहेर गेलो नाही. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून तालुक्यात विकासकामे आणली. डोंगराळ भागातील लोकांच्या समस्या सोडविण्याचाही प्रयत्न केला.

विकासकामे विरोधकांना आवडले नाही :विरोधकांना जास्त विकासकामे आणि निधी दिल्याचा आरोप त्यांनी अजितदादांवर केला. वास्तविक पाहता महाविकास आघाडी सरकारमध्ये पाटण तालुक्यातील जनतेचा चौफेर विकास व्हायला पाहिजे होता, परंतु तसे घडले नाही. विरोधकांच्या माध्यमातून का होईना आपल्याच मतदार संघाचा विकास होतोय हे पाहून मंत्री महोदयांनी खूष व्हायला पाहिजे होते, मात्र त्याच्या उलट हे मंत्री वागत होते असे पाटणकर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details