कराड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(NCP Chief Sharad Pawar) यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण(Yashwantrao Chavan) यांच्या स्मृतीदिनाच्या एक दिवस आधीच कराड(Karad) येथील प्रितीसंगमवर(Pritisangam) जाऊन अभिवादन केले. बुधवारी सकाळी शरद पवार यांनी खासदार श्रीनिवास पाटील(Shrinivas Patil) आणि इतर मान्यवरांसह प्रितीसंगमवर यशवंतराव चव्हाण यांचे स्मरण करत त्यांना अभिवादन केले.
Pawar at Pritisangam : एक दिवस आधीच शरद पवार प्रितीसंगमवर, यशवंतरावांना वाहिली आदरांजली प्रितीसंगमवर अभिवादन
दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतीदिन 25 नोव्हेंबर रोजी म्हणजेच गुरूवारी आहे. मात्र शरद पवार यांनी बुधवारी सकाळी कराडच्या प्रितीसंगमवर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली. यावेळी राज्याचे सहकार मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, वेणूताई चव्हाण ट्रस्टचे विश्वस्त व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
शशिकांत शिंदेंची घेतली भेट
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निकालाच्या दिवशी साताऱ्यात झालेल्या राड्यानंतर शरद पवार मंगळवारी दुपारी साताऱ्यात दाखल झाले होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन रात्री ते कराडला मुक्कामी आले. पवारांच्या या अचानक दौऱ्यामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. आज सकाळी प्रितीसंगमवर जाऊन त्यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर मान्यवरांसह ते महाबळेश्वर येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिबिरासाठी रवाना झाले.