सातारा - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मशीद, इमारतीचे छत अथवा मैदानावर नियमित नमाज पठण, तरावीह आणि इप्तारसाठी एकत्र येवू नये. मुस्लिम बांधवांनी शासनाच्या सूचनांचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्येही कटाक्षाने करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.
मुस्लीम बांधवांनी शासनाच्या सूचनांचे पालन रमजान महिन्यातही करावे; पोलीस अधीक्षकांचे आवाहन - पवित्र रमजान महिना
लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्या प्रमाणे सोशल डिस्टन्सिंगबाबत राज्य सरकारच्या ज्या सूचना आहेत. त्यांचे पालन पवित्र रमजान महिन्यातही करावे. कोणताही सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येवून करू नये. सर्व मुस्लीम बांधवांनी त्यांच्या घरातच नियमित नमाज पठण, तरावीह आणि इप्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पाडावे, असे आवाहनपोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.
लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्या प्रमाणे सोशल डिस्टन्सिंगबाबत राज्य शासनाच्या ज्या सूचना आहेत. त्यांचे पालन पवित्र रमजान महिन्यातही करावे. कोणताही सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येवून करू नये. सर्व मुस्लीम बांधवांनी त्यांच्या घरातच नियमित नमाज पठण, तरावीह आणि इप्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पाडावे, असे आवाहनही सातपुते यांनी केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुस्लिम समाजातील मौलवीही समाजबांधवांना शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. शासन सर्वांच्या सुरक्षेसाठीच निर्णय घेत असून त्याला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे.