सातारा -खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे समर्थक दीपक उर्फ आप्पा मांढरे यांच्यावर पूर्ववैमनस्यातून बुधवारी रात्री अकराच्या सुमारास गोळ्या झाडून त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला आहे. (attack on supporter of Udayanraje Bhosale). या हल्ल्यात मांढरे यांच्या पोटात दोन गोळ्या लागल्याने ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गुन्हे शाखेने अवघ्या पाच तासात मुख्य संशयित प्रणव शैलेश पाटोळे (वय १९, रा. खंडोबाचा माळ, सातारा) याच्यासह तीन हल्लेखोरांना अटक केली आहे.
सातारा शहरात दिवसभर तणाव -राजवाडा परिसरात खासदार उदयनराजेंचे समर्थक आप्पा मांढरे यांच्यावर खुनी हल्ला झाल्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या घटनेनंतर साताऱ्यात तणावाचे वातावरण होते. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे. घटनेनंतर राजवाडा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.