सातारा - म्हसवे गावातील ५ वर्षांच्या बालकाचा खून अनैसर्गिक कृत्य करण्याच्या उद्देशाने झाल्याची माहिती पुढे आली आहे. मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून अवघ्या १६ वर्षांच्या मुलाने हा प्रकार केला. या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी दोन तासात ताब्यात घेतले.विघ्नेश दत्तात्रय चोपडे (वय ५ वर्षे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
अनैसर्गिक कृत्य करण्याच्या उद्देशाने बालकाची हत्या, मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलाकडून कृत्य - सातारा गुन्हेवृत्त
म्हसवे गावातील ५ वर्षांच्या बालकाचा खून अनैसर्गिक कृत्य करण्याच्या उद्देशाने झाल्याची माहिती पुढे आली आहे. मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून अवघ्या १६ वर्षांच्या मुलाने हा प्रकार केला. या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी दोन तासात ताब्यात घेतले.
satara murder news
बंद घरात आढळला मृतदेह -
साताऱ्याजवळ म्हसवे गावात मंगळवारी सायंकाळी सहा ते साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. गावातीलच सदानंद रामचंद्र सोनमळे यांच्या बंद घरात, किचनमध्ये विघ्नेश दत्तात्रय चोपडे (वय ५ वर्षे) या बालकाचा मृतदेह आढळून आला होता. तालुका पोलिसांनी प्रथमदर्शनी खुनाचा गुन्हा नोंदवून तापास सुरु केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या आदेशानुसार सहायक निरीक्षक आनंदसिंग साबळे, उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्या अधिपत्याखाली विशेष पथके क्रियाशील झाली. घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करीत असताना पोलिसांना धागेदोरे हाती लागले.
नाकतोंड दाबल्याने मृत्यू -
घटनास्थळाजवळील एका १६ वर्षीय मुलाने बालकाला बंद घरात नेऊन अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. बालकाने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भितीपोटी मुलाने बालकाचे नाकतोंड दाबले. त्यातच बालकाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले.
पोलिसांचे कौशल्य -
पोलिसांनी १६ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासामध्ये पोलिसांनी गावातील एका छोट्या मुलाला विश्वासात घेतले. पोलिसांच्या कौशल्यपूर्ण चौकशीत त्या मुलाने संशयित मुलाला बालकाला बंद घरात घेऊन जाताना पाहिले होते. बालकाला अखेरचं पाहिलेला हा महत्त्वपुर्ण दूवा ठरला. त्याच्या चौकशीत खुनाच्या गुन्ह्यावर प्रकाश पडला आणि संशयित पोलिसांच्या ताब्यात आला. मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून त्याने हे कृत्य केले असावे, असे पोलिसांनी सांगितले.
Last Updated : Dec 8, 2021, 10:00 PM IST