सातारा -साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते. उमेदवारी दाखल केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस मात्र आमदार गोरे यांनी पाठ फिरवली. त्यामुळे गोरे यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असला तरी माढा मतदारसंघातील आपली भूमिका अजून स्पष्ट केले नाही. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
साताऱ्यातून उदयनराजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
आम्ही काही दिवसातच माढा मतदारसंघातील बैठक घेऊन काही मुद्द्यांवर चर्चा करून मतभेद मिटवणार आहोत. तसेच माढा मतदारसंघातली उमेदवार सुद्धा निवडून आणू ,असे सांगितले.
यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना माढा मतदारसंघातील आमदार जयकुमार गोरेच्या राष्ट्रवादीच्या सभेला तसेच बैठकांना गैरहजरीबाबत विचारले असता, ते म्हणाले आम्ही काही दिवसातच माढा मतदारसंघातील बैठक घेऊन काही मुद्द्यांवर चर्चा करून मतभेद मिटवणार आहोत. तसेच माढा मतदारसंघातली उमेदवार सुद्धा निवडून आणू ,असे सांगितले. काही वेळातच पत्रकार परिषद संपल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण व आमदार गोरे यांची चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आमदार गोरे कोणता निर्णय घेणार याकडे सातारा व माढा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.