महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Yakub Memon Grave Controversy याकूब मेमन कबरीच्या वादात उदयनराजेंची उडी, म्हणाले... - दहशतवादी याकुब मेमन कबर

Yakub Memon Grave Controversy याकूब मेमनच्या कबरीवरील सजावटीमुळे निर्माण झालेल्या वादात आता शिवाजी महाराजांचे थेट वंशज आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले MP Udayanraje Bhosle यांनीही उडी घेतली आहे. आज राजेशाही असती तर असे प्रकार घडले नसते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

खासदार उदयनराजे भोसले
खासदार उदयनराजे भोसले

By

Published : Sep 8, 2022, 10:05 PM IST

सातारा मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आणि फाशी देण्यात Yakub Memon Grave Controversy आलेल्या याकूब मेमनच्या कबरीवरील सजावटीमुळे निर्माण झालेल्या वादात आता छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे. Mumbai bomb blast 1993 आज राजेशाही असती तर, असे प्रकार घडले नसते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजल खानाची कबर खुली करायला हवी. अन्यथा लोकांना शिवाजी महाराजांचा इतिहास कसा कळणार, असेही उदयनराजेंनी MP Udayanraje Bhosle म्हटले आहे.

याकूब मेमन कबरीच्या वादात उदयनराजेंची उडी

तुम्हा लोकांनाच लोकशाही पाहिजे अतिरेकी याकूब मेमनच्या कबरीवरील सुशोभीकरणाच्या प्रश्नावर बोलताना खासदार उदयनराजे म्हणाले, तुम्ही लोकांनीच मागणी केली राजेशाही नको लोकशाही हवी. Terrorist Yakub Memons Grave त्यामुळे आज याकूब मेमनच्या कबरीवर असे प्रकार होत आहेत. राजेशाही असती, तर केव्हाच त्या कबरीचा बंदोबस्त आम्ही केला असता. कबरीच्या उदात्तीकरणाविरोधात एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने आणि भाजपने पाऊल उचलले, ही चांगली गोष्ट आहे. परंतु, आधीच्या महाविकास आघाडी सरकारला हे सुशोभीकरण दिसले नव्हते का ? असा सवालही उदयनराजेंनी MP Udayanraje Bhosle केला आहे.

अफजल खानाची कबर प्रशासनाने खुली करावीअफजल खान कबरीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफझल खानाची कबर प्रशासनाने खुली करावी. त्याशिवाय लोकांना शिवाजी महाराजांचा इतिहास कसा कळणार ?

कोण आहे याकूब मेमनयाकूब मेमन हा मुंबईत घडलेला 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी होता. न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याला फासावर चढविण्यात आले होते. फासावर चढवल्यानंतर 30 जुलै 2015 साली मुंबईतील मरीन लाइन्स येथील बडा कब्रस्तान येथे दफन करण्यात आले होते.

काय आहे प्रकरण1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी याकुब मेमनला जिथे दफन करण्यात आले आहे. त्या कबरीची जमीन त्याच्या कुटुंबाने खरेदी केल्याची चर्चा आहे. मुस्लिम दफनभूमी ट्रस्टीने विकली आहे का असा सवालही उपस्थित होत आहे. कारण मेमन दफन झाल्यानंतर साधी असलेली कबर सजवण्यात आली होती. ओट्याला संगमरवरी दगड बसवण्यात आले आहेत. LED दिवे लावले होते. हे दिवे रात्रीच्यावेळी चालू असतात. मुख्यतः मेमनच्या कबरीवर त्यांचा फोकस असतो. स्मशानभूमी विश्वस्तांकडून कोपऱ्यात स्विच बोर्ड लावून वीजपुरवठा केला जात होता. कबरीची जमीन विकली नाही तर फाशी झालेल्या दोषीच्या कबरीला इतकी व्हीआयपी वागणूक का? असा सवाल उपस्थित करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details