सातारा -सातारच्या पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती स्मारकाच्या नुतनीकरणासाठी नगरपालिकेने 16 कोटी 14 लाखांचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. ( MP Udayanaraje Information ) त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची दिल्लीत भेट घेतली.
उदयनराजे- मुख्यमंत्र्यांची दिल्लीत भेट -दिल्ली दौर्यावर असणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी सदिच्छा भेट घेतली. उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस आपल्याबरोबर असल्यामुळे कोणत्याही अडचणी येणार नाहीत, अशा शब्दांत उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांना प्रोत्साहन दिले. सातार्यातील विकासकामांबाबत चर्चा करताना उदयनराजेंनी पोवईनाका येथील शिवप्रभुंच्या स्मारक नुतनीकरणाच्या कामांची माहिती दिली. स्मारक परिसराच्या विकासाचा 16 कोटी 14 लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्यानुसार निधी मिळवा, अशी मागणी केली आहे.