महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खासदार श्रीनिवास पाटील यांनी संसदेत मांडल्या जिल्ह्यातील समस्या

सातारा जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत आवाज उठवला.

By

Published : Mar 19, 2021, 4:38 PM IST

खासदार श्रीनिवास पाटील
खासदार श्रीनिवास पाटील

कराड (सातारा) - खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लोकसभेत सातारा जिल्ह्यातून जाणार्‍या महामार्गाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात संसदेत आवाज उठवला. त्यांच्या मागण्यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.

लोकसभेत खासदार श्रीनिवास पाटील

पाटील यांनी केल्या 'या' मागण्या -

  • सातारा लोकसभा मतदार संघातील पारगाव येथे नागरिकांच्या सोयीसाठी नवीन पूल बांधाण्यात यावा.
  • महामार्गावरील पुलावर व पुलाखाली रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना अपघाताच्या घटना घडत आहेत. हे अपघात टाळण्यासाठी महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी विद्युतीकरण करण्यात यावे.
  • कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील अपघातांच्या घटना टाळण्यासाठी प्राधान्याने येथील पुलाचे सहापदारीकरण करण्यात यावे.
  • पुणे ते शेंद्रेपर्यंतच्या महामार्गाची अवस्था बिकट आहे. कामेही अपूर्ण अवस्थेत आणि दर्जाहीन झाली आहेत. त्याची सुधारणा करण्यात यावी.
  • खंबाटकी घाट बायपाससाठी दोन बोगदे तयार होत आहेत. मात्र, हे काम संथगतीने सुरू असल्याने या बोगद्यांच्या कामाला गती देण्यात यावे.

गडकरी यांचा सकारात्मक प्रतिसाद -

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. सातारा जिल्ह्यातील महामार्गाची अपूर्ण कामे येत्या दोन-तीन महिन्यात पूर्ण होतील. मी लवकरच तिकडे येणार आहे. खासदार म्हणून आता आपल्याला पूर्ण अधिकार दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी बैठक घेऊन जिथे-जिथे अपघातांची ठिकाणे आहेत. ती मला कळवा. त्यावर त्वरीत निर्णय घेतला जाईल, असे गडकरी म्हणाले. तसेच अपघात मुक्त रस्ते करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूयात, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा -महाराष्ट्र-मध्य प्रदेश बससेवा बंद, शिवराज सिंह यांनी घेतला निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details