महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रहिमतपुरात व्यसनी मुलाने लोखंडी पट्ट्याने केलेल्या मारहाणीत आईचा मृत्यू - satara crime news

शहाजी लाला पवार (वय ३६, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर सुलोचना लाला पवार (वय ७०, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

mother murdered by son
mother murdered by son

By

Published : Aug 6, 2021, 8:25 PM IST

सातारा -कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे किरकोळ वादातून मुलाने आईच्या डोक्यात व तोंडावर लोखंडी पाट्याने मारहाण केली, ज्यात संबंधित महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रागाच्या भरात कृत्य

शहाजी लाला पवार (वय ३६, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर सुलोचना लाला पवार (वय ७०, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनेनंतर संशयित स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने आपल्याकडून रागाच्या भरात आईचा खून झाल्याची माहिती दिली.

किरकोळ कारणाचे खूनात पर्यावसान

श्याम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की सुलोचना पवार यांचा मुलगा शहाजी पवार याच्याबरोबर रहिमतपूर बस स्थानकाजवळील संरक्षण भिंतीस लागून असलेल्या झोपडीत राहत होते. शहाजी पवार याला दारूचे व्यसन होते. शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून आई सुलोचना व मुलगा शहाजी यांच्यात भांडण झाले. रागाच्या भरात शहाजी पवार याने आईच्या डोक्यात व तोंडावर लोखंडी पाट्याने मारहाण केली. या मारहाणीत सुलोचना पवार यांचा जागीच मृत्यू झाला.

स्वत:हून झाला हजर

संशयित आरोपी शहाजी पवार हा सकाळी स्वत:हून रहिमतपूर पोलीस ठाण्यात हजर झाला. आपण केलेल्या मारहाणीत आई सुलोचना पवार हिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असल्याची माहिती रहिमतपूरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details