सातारा - तोंड दाबून पोटच्या पाच महिन्यांच्या लेकराचा खुन केल्याची कबुली तरडगाव (ता. फलटण) येथील महिलेने दिली आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
आईने पश्चातापाने दिली पोटच्या गोळ्याच्या खुनाची कबूली - सातारा पोलीस बातमी
या खून प्रकरणी आरती गायकवाड या महिलेला लअटक करण्यात आली आहे. संशयीतेला फलटण न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नेमकं कशामुळे महिलेने पोटच्या मुलाचा खून केला हे अद्याप पुढे आले नसले तरी तपासात त्यावर प्रकाश पडणार आहे. विशाल वायकर अधिक तपास करत आहेत.
स्वत:च केला पोलिसांना फोन-आरती सोमनाथ गायकवाड (रा. पांढरी, तरडगाव, ता. फलटण) असे पोलिसांच्या अटकेत असलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरती सोमनाथ गायकवाड या महिलेने लोणंद पोलीस ठाण्यात फोन करुन सांगितले की स्वत:च्या पाच महिन्यांच्या बाळाला १२ एप्रिलला दुपारी ठार मारुन पुरले आहे. 'तुम्हीं लगेच गाडी पाठवा. नाहीतर मी आणखी दुसऱ्या कोणाचा तरी खून करेन' असं ती फोनवर म्हणाली.
असा केला खून-पोलिसांनी जाऊन खात्री केली असता तिने तिचा लहान मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड (वय पाच महिने) याला ब्लँकेटमध्ये गुंडाळले. उशीने नाक- तोंड दाबुन खून केला असल्याचे सांगितले. लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी घटनास्थळी जाऊन महिलेस ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे यांनी फिर्याद दिली असुन महिलेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खुनाचे कारण अस्पष्ट -या खून प्रकरणी आरती गायकवाड या महिलेला लअटक करण्यात आली आहे. संशयीतेला फलटण न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नेमकं कशामुळे महिलेने पोटच्या मुलाचा खून केला हे अद्याप पुढे आले नसले तरी तपासात त्यावर प्रकाश पडणार आहे. विशाल वायकर अधिक तपास करत आहेत.