कराड (सातारा) -पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांना वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलने कोरोना मुक्तीचे दुसरे सहस्त्रक पूर्ण केले. आतापर्यंत २००६ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटल खर्या अर्थाने कोविड योध्दा ठरले आहे.
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने सुरुवातीपासूनच कोरोनामुक्तीच्या लढ्यात योगदान दिले आहे. रुग्णांसाठी स्वतंत्र कोरोना वॉर्ड सुरू केले. दि. 18 एप्रिल रोजी कृष्णा हॉस्पिटलमधून पहिला रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेला. त्यानंतर कोरोनामुक्तीची मालिकाच सुरू झाली. आता कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे दुसरे सहस्त्रक पूर्ण केले असून हॉस्पिटलमधील सोयी-सुविधांबद्दल रुग्णांसह प्रशासनाकडून हॉस्पिटल प्रशासनाचे कौतुक होत आहे.