महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा : जिल्ह्यात एक हजार पाच नवे रुग्ण; बाधितांचा दर 9.75 टक्क्यांवर - सातारा कोरोना बातमी

सातारा जिल्ह्यात शनिवारी 1 हजार 5 नव्या रुग्णांची वाढ झाली असून 18 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 511 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.

सातारा
सातारा

By

Published : Jun 27, 2021, 3:22 AM IST

सातारा -शनिवारी (दि. 27 जून) तासात सातारा जिल्ह्यात 1 हजार 5 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 1 लाख 90 हजार 462 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर आजपर्यंत एकूण 4 हजार 321 बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली.

कराडमध्ये अधिक बाधित

प्राप्त अहवालानुसार कराड तालुक्यात सर्वाधिक 246 रुग्ण आढळले. तर जावळीत 25, खंडाळा 38, खटाव 158, कोरेगाव 73, माण 56, महाबळेश्वर 20, पाटण 37, फलटण 69, वाई 44, सातारा 224 व इतर 5 असे बाधीत तालुकानिहाय आढळून आले. आज अखेर एकूण 1 लाख 90 हजार 462 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. पाॅझिटीव्हिटी रेट 9.75 टक्के इतका आहे.

18 रुग्ण दगावले

शनिवारी मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये जावली 1, कराड 8, खटाव 1, सातारा 4, माण 1, पाटण 1, महाबळेश्वर 1, वाई 1 यांचा समावेश आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4 हजार 321 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. 9 हजार 451 रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

511 नागरिकांना डिस्चार्ज

शनिवारी संध्याकाळपर्यंत 511 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. आज अखेर 1 लाख 77 हजार 705 नागरीक या आजारातून बरे झाले आहेत.

हेही वाचा -कराडमधील मुलाकडून ताज हॉटेलला धमकीचा कॉल; मुलासह कुटुंबीयांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ABOUT THE AUTHOR

...view details