महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा : 5 हजार 107 जण कोरोनामुक्त, 1 हजार 522 नवे रुग्ण

सातारा जिल्ह्यात मागील 24 तासांत 1 हजार 522 नव्या करोनाग्रस्तांची वाढ झाली असून 32 बाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या 5 हजार 107 नागरिकांना

शासकीय रुग्णालय
शासकीय रुग्णालय

By

Published : Jun 2, 2021, 10:17 PM IST

सातारा - आज (दि. 2 जून) संध्याकाळपर्यंत तब्बल 5 हजार 107 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रुग्णालयातून बरे होऊन घरी परतणाऱ्या नागरिकांचा आजवरचा हा सर्वांत मोठा आकडा आहे.

खटावच्या वाढीची चिंता

मगील 24 तासांत 1 हजार 522 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 32 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जावळीत 52, कराड 244, खंडाळा 80, खटाव 227, कोरेगाव 130, माण 133, महाबळेश्वर 20, पाटण 47, फलटण 204, सातारा 297, वाई 77 व इतर 11 असे बाधीत तालुकानिहाय आढळून आले. आजअखेर एकूण 1 लाख 69 हजार 314 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. 10 हजार 402 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 1 हजार 522 बाधित निघाले. जिल्ह्याचे आजचे बाधितांचे प्रमाण 14.63 टक्के इतके आहे.

32 बाधितांचा मृत्यू

आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये जावळी 1, कराड 1, खंडाळा 1, खटाव 4, कोरेगाव 5, माण 2, फलटण 3, सातारा 13, वाई 2 यांचा समावेश आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 730 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 17 हजार 529 रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 1 लाख 48 हजार 52 नागरिक उपचार पूर्ण झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

हेही वाचा -सातारा जिल्ह्यात 8 जूनपर्यंत कडक निर्बंध कायम; जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details