सातारा -जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 977 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 15 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली. रविवारी (दि. 27 जून) संध्याकाळपर्यंत 241 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. आज अखेर 1 लाख 77 हजार 946 नागरीक या आजारातून बरे झाले आहेत.
कराड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
कराड तालुक्यात सर्वाधिक 255 रुग्ण आढळले. तर जावळीत 25, खंडाळा 38, खटाव 95, कोरेगाव 97, माण 48, महाबळेश्वर 18, पाटण 53, फलटण 91, सातारा 217, वाई 25 व इतर 15 असे बाधीत तालुकानिहाय आढळून आले. आज अखेर एकूण 1 लाख 91 हजार 435 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. 8 हजार 753 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 977 बाधित निघाले.
10 हजार 187 सक्रिय रुग्ण