महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील देणार देशमुख यांना पाठिंबा..? - MNS support to prabhakar deshmukh

मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे देखील उद्या देशमुख यांना पाठिंबा देणार असल्याचे माहिती समोर येत आहे.

धैर्यशील पाटील

By

Published : Oct 19, 2019, 12:18 PM IST

सातारा- माण-खटाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना दिवसेंदिवस वाढत पाठिंबा बघता अनेक नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यातच मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे देखील उद्या देशमुख यांना पाठिंबा देणार असल्याचे माहिती समोर येत आहे.

हेही वाचा - ज्या योद्ध्याजवळ उमेद आहे, तो कधीही हारू शकत नाही; सोशल मीडियावर पवारांचा ट्रेंड


अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख पाठिंबा व कारवाई
जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांना बंडखोरी करणाऱ्यावरती शिवसेना, भाजप यांनी कारवाई केली आहे. यामध्ये भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीपराव यळगावकर, जिल्हाउपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेना नेते रणजित देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर, रासप जिल्हाध्यक्ष ममूशेठ वीरकर, बबन वीरकर, काँग्रेसचे एम.के. भोसले यांनी देखील प्रभाकर देशमुख यांना पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा - 'कराडकरांच्या मानगुटीवरचे भूत आम्ही उतरवले'

ABOUT THE AUTHOR

...view details