महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मर्जीतील ठेकेदारांचे कमिशन लाटाण्यासाठी पालिका मदत देऊ शकत नसावी, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा हल्लाबोल - satara city news

खासदार उदयनराजे भोसले यांनी कडक निर्बंधामध्ये आर्थिक दिलासा देण्यासाठी फेरीवाल्यांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. यासंदर्भात काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, कोरोना आणि कडक निर्बंधामुळे गतवर्षात फेरीवाल्यांचे अतोनात नुकसान झाले. फेरीवाल्यांचे जगणे मुश्किल झाले असून त्यांच्यासह कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Shivendrasinh Raje bhosale
शिवेंद्रसिंहराजे भोसले

By

Published : May 26, 2021, 7:50 PM IST

सातारा- मर्जीतील ठेकेदारांची बिले काढायची गडबड असल्याने आणि त्यातून कमिशन लाटायचे असल्याने सातारा नगरपालिका फेरीवाल्यांचे एक हजार रुपये देऊ शकत नसावी. खासदार उदयनराजेंच्या घोषणेची पालिका अंमलबजावणी कधी करणार, असा सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला.

फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ

खासदार उदयनराजे भोसले यांनी कडक निर्बंधामध्ये आर्थिक दिलासा देण्यासाठी फेरीवाल्यांना प्रत्येकी एक हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. यासंदर्भात काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, कोरोना आणि कडक निर्बंधामुळे गतवर्षात फेरीवाल्यांचे अतोनात नुकसान झाले. फेरीवाल्यांचे जगणे मुश्किल झाले असून त्यांच्यासह कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

दीड महिना उलटला तरी हालचाल नाही

गेल्या महिन्याभरापासून कडक निर्बंध सुरू असून हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्यांसह त्यांच्या बायकापोरांची, वृद्ध आईवडीलांची उपासमार सुरू आहे. मात्र, अद्यापही उदयनराजेंनी जाहीर केलेल्या मदतीची रक्कम पालिकेकडून फेरीवाल्यांना मिळालेली नाही. फेरीवाले डोळ्यात प्राण आणून या आर्थिक मदतीची वाट बघत आहेत. घोषणा करून दीड महिना उलटला तरी पालिकेकडून कोणतीही हालचाल नाही. उदयनराजेंनी जाहीर केल्याप्रमाणे एक हजार रुपये फेरीवाल्यांना अजून का दिले गेले नाहीत? फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला असल्याने खासदार उदयनराजेंच्या घोषणेप्रमाणे पालिकेकडून फेरीवाल्यांना तत्काळ मदत मिळाली पाहिजे, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

अभिनव योजना जाहीर करा

खासदार उदयनराजेंनी घोषणा करुनही फेरीवाल्यांना पालिकेकडून अद्यापही आर्थिक मदत मिळाली नाही याचे आश्चर्य आहे. आता फेरीवाल्यांना मदत देता येत नसेल तर, फेरीवाल्यांचा व्यपार सुरू झाल्यानंतर सत्ताधारी नगरसेवक फेरीवाल्यांकडून पुन्हा हप्ते गोळा करण्यास सुरुवात करतील. त्यावेळी त्यामध्ये एक हजार रुपये सवलत देऊ, अशी अभिनव योजना तरी पालिकेने जाहीर करून टाकावी, असा उपरोधिक टोला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे.

हेही वाचा -काळ्या बुरशीवरील उपचार आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मिळणार

ABOUT THE AUTHOR

...view details