महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तर दुसरे सामाजिक पानिपत होईल, अन् इतिहास माफ करणार नाही : आ. शिवेंद्रसिंहराजे - shivsendra raje on maratha reservation

राज्यात सध्या मराठा आरक्षणावर राजकारण फारच तापले आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असा काहीसा संघर्ष निर्माण झाल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आता सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

mla shivendra raje bhosale
दुसरं सामाजिक पानिपत होईल

By

Published : Nov 2, 2020, 9:00 PM IST

Updated : Nov 2, 2020, 9:12 PM IST

सातारा - इतिहासात मराठ्यांचे एकदा पानिपत झाले होते आणि जर का आता मराठा समाज एकत्र आला नाही तर दुसरे सामाजिक पानिपत होईल. यावेळी मात्र इतिहास आपल्याला माफ करणार नाही, अशा शब्दात भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर फाटाफूट करु पाहणाऱ्यांचे कान उपटले. शहरात आयोजित विभागीय मराठा आरक्षण संदर्भातील गोलमेज परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी आयाेजकांनी शिवेंद्रसिंहराजेंचे मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून स्वागत केले.

दुसरे सामाजिक पानिपत होईल

मी मराठा समाजातील घटक म्हणून आलाे-

आमदार म्हणून अथवा राजे म्हणून मी येथे आलेलो नाही. मी मराठा समाजातील घटक म्हणून आलाे आहे,असे सुरुवातीलाच स्पष्ट करुन ते म्हणाले, "मराठा समाजाच्या लढ्याला यश येण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न कराल, त्यास माझा पाठींबा आहे. मराठा आरक्षणावरून समाजातील युवा वर्गात नाराजीचे वातावरण आहे. दुर्दैवाने सर्वजण एकत्र येत नाहीत. आरक्षणाचा लढा जिंकायचा असेल तर एकत्र येऊन लढले पाहिजे. सर्व संघटनांनी एकत्र आले तरच लढा जिंकला जाऊ शकतो."

महाराष्ट्रातील सामाजिक घडी विस्कटेल-


शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, आरक्षणामुळे आजच्या पिढीवर फार माेठा परिणाम हाेत आहे. या सर्व गाेष्टींचा विचार राज्य, केंद्र सरकार अथवा सर्वच पक्षांनी केला पाहिजे. युवा वर्गाचे नुकसान टाळण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. अन्यथा भविष्यात महाराष्ट्रातील सामाजिक घडी विस्कटलेली असेल. सर्वांनी एकत्र यावे, मराठा आरक्षणासाठी जे काम करत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे रहाण्याची गरज आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली ही मराठ्यांची ताकद आहे. यावेळी सुरेशदादा पाटील, विजयसिंह महाडिक यांच्यासह मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित हाेते.

Last Updated : Nov 2, 2020, 9:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details