महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवरायांच्या जयंतीचा वाद थांबविणे गरजेचे - शिवेंद्रराजे भोसले - शिवजयंती तारखांचा वाद

राज्यात शिवजयंती साजरी करण्याविषयी अनेक मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध तारखांना साजरी केली जाते. मात्र, याबाबत शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. शिवप्रेमी आणि जनतेचा विचार करून एकाच तारखेस शिवजयंती करण्यात यावी, असे मत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.

MLA shivendra raje bhosale
शिवेंद्रराजे भोसले

By

Published : Feb 7, 2020, 10:31 AM IST

सातारा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा वाद थांबविणे गरजेचे आहे. शिवजयंती राज्यात तसेच देशात मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे. मात्र, तारखांचा वाद निर्माण झाला आहे. यातून शिवछत्रपतींचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. सर्वांनी शिवजयंतीची एकच तारीख निश्‍चित करून त्याच दिवशी दिमाखात शिवजयंती साजरी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शिवरायांच्या जयंतीचा वाद थांबविणे गरजेचे - शिवेंद्रराजे भोसले

राज्यात शिवजयंती साजरी करण्याविषयी अनेक मतमतांतरे व्यक्त केली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध तारखांना साजरी केली जाते. याबाबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे 13 वे वंशज म्हणून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना विचारले असता, ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रत्येकजण मानतो. प्रत्येक जाती, धर्माच्या लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आदराची भावना आहे. मात्र, जयंतीच्या तारखेच्या वादामुळे त्यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. खरंतर शासनाने 19 फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख जाहीर केली आहे. परंतु, काही शिवप्रेमींना हे मान्य नाही. त्यामुळे शिवजयंती वेगवेगळ्या तारखेस साजरी होत आहे. खरंतर जयंतीच्या तारखेचा वाद मिटवून एकच शिवजयंती होईल यासाठी प्रयत्न व्हावेत, असे शिवप्रेमी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील व्यक्ती म्हणून मला वैयक्तिक वाटत नाही, तर प्रत्येक शिवभक्ताची हीच भावना आहे, असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबाबत शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. शिवप्रेमी आणि जनतेचा विचार करून एकाच तारखेस शिवजयंती करण्यात यावी. तसेच निश्चित होणारी तारीख सर्वांनी मान्य करावयास हवी, असे मत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details