कराड (सातारा)- टाळेबंदी केली तर सामान्यांवर नुकसान सोसण्याची वेळ येईल. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी हा पर्याय असला तरी ती स्वीकारणे नुकसानीचे असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मोठा निर्णय घेण्यासाठी भाग पाडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
देशातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत सरकार मदत करायला तयार नसेल तर काय करायचं, असा सवाल करत केंद्र सरकारने हाफकिनला कोरोना लस उत्पादनासाठी परवानगी द्यावी. भारत बायोटेकने साधन सामुग्री आणि लसीचे तंत्र पुरवावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पहिल्या टप्प्यात खूप नुकसान झाले आहे. दुसर्या टप्प्यानेही मोठे नुकसान होईल. त्यामुळे या संदर्भात योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. शासनाने काही उपाययोजना केल्या आहेत. तर काही केलेल्या नाहीत. टाळेबंदी करू नये व जर केला तर परदेशाप्रमाणे थेट नागरिकांच्या बँक खात्यात पैसे जमा करावे. या मागणीचा त्यांनी पुनरूच्चार केला. टाळेबंदी केली तर अर्थव्यवस्थेला फटका बसणार नाही. टाळेबंदी हा लोकांचा जीव वाचवण्यासाठी असते. जीव वाचवायचा की रोजगार हा प्रश्न असला, तरी जीव महत्त्वाचा आहे. टाळेबंदी करायची असेल, तर पूर्वसूचना द्यावी, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाणांनी केली.
केंद्र सरकारने लोकांत्या खात्यात पैसे जमा करावेत