सातारा -आमदार नितेश राणे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहतात. पाटणमधील हिंदु आक्रोश मोर्चानंतर साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) व आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. शक्ती कायदा वेळीच (Shakti Law) आणला असता तर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील दोन ते तीन मंत्री जेलमध्ये गेले असते. अगदी आदित्य ठाकरेसुद्धा आत गेले असते, अशी टीका आमदार नितेश राणे (Mla Nitesh Rane) यांनी केली.
रोहित पवारांचे निवडून यायचे वांदे -लव जिहाद आणि धर्मांतर कायद्यावर सगळेच बोलता बोलत आहेत. मात्र, शक्ती कायद्यावर कोणी बोलत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोल्हापुरात केला होता. त्याला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, रोहित पवारांनी सगळीकडे तोंड खूपसण्यापेक्षा कर्जत-जामखेडकडे बघावे. तुमच्या मतदारसंघाची अवस्था पहा. २०२४ ला निवडून यायचे तुमचे वांदे आहेत. रोहित पवार हा वेगळ्या प्रकारचा पवार दिसतोय तो सगळीकडे तोंड घालतो, असा टोलाही त्यांनी लगावला. पाटणमधील हिंदु आक्रोश मोर्चानंतर साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.