महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार जयकुमार गोरेंनी दिला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा - माण

जिल्ह्यात राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. माण मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणूकीवेळी शेखर गोरे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडेंनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

आमदार जयकुमार गोरेंनी दिला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा

By

Published : Aug 31, 2019, 5:05 AM IST

सातारा- जिल्ह्यात राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसलाही मोठा धक्का बसला आहे. माण मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणूकीवेळी शेखर गोरे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडेंनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

आमदार गोरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. भाजपने सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला अगोदरच सुरुंग लावला आहे. आता काँग्रेस आमदरा जयकुमार गोरेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने माण मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आमदार गोरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात माण तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभात गोरे भाजप प्रवेश करतील असेही बोलले जात आहे.

लोकसभा निवडणूकीदरम्यान काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपमध्ये पाठविण्यात तसेच त्यांना लोकसभा निवडणूकीत निवडून आणण्यात आमदार गोरेंनी मुख्य भूमिका पार पाडली होती. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशावेळीच आ. गोरेंचाही भाजप प्रवेश निश्चित झाला होता. त्यांच्याबरोबर जिल्ह्यातील काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीपाठोपाठ सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा गट आ. गोरेंबरोबर भाजपवासी होणार असल्याने जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.

आमदार गोरे यांच्या वरती अनेक गुन्हे दाखल आहेत. खंडणी, अपहरण, विनयभंग असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्यांच्यावर आहेत. हे गुन्हे मागे घेण्यासाठी आमदार गोरे हे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची उलट सुलट चर्चा सातारा जिल्ह्यात रंगली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details