महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय शिंदेच्या प्रचाराला काँग्रेस आमदार जयकुमार गोरेंची दांडी - NCP's rally

काँग्रेसच्या अनुपस्थित आज राष्ट्रवादीने फलटण, माण-खटाव या भागात मोठ्या सभा घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

माढा मतदार संघातली आघाडीचे उमेदवार संजय शिंदेंच्या प्रचाराची सभा

By

Published : Mar 31, 2019, 5:55 AM IST

सातारा - माण-खटाव, फलटण याठिकाणी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी पाठ फिरवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वरती जोरदार टीका केली आहे. रामराजे म्हणाले "मल्ल्याला लंडन मध्ये शोधण्यापेक्षा, मल्ल्या फलटणमध्ये आहे तो बघा" यावरती सभागृहात मोठा हशा पिकला.

माढा मतदार संघातली आघाडीचे उमेदवार संजय शिंदेंच्या प्रचाराची सभा

या सभेत शशिकांत शिंदे यांनी भाजप-सेनेवरती जोरदार हल्ला चढवला तर प्रभाकर देशमुख यांनी आमचे स्थानिक प्रश्न पाणी योजना, रस्ते, शिक्षण रोजगार, दहशत मुक्त तालुका याकडे लक्ष देऊन आमच्या भागाचा विकास करावा, असे मत व्यक्त केले आहे. आमची नाराजी दूर झाली आहे. पवार साहेब बोलतील तीच पूर्व दिशा म्हणून कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

काँग्रेसच्या अनुपस्थित आज राष्ट्रवादीने फलटण, माण-खटाव या भागात मोठ्या सभा घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच फ्लेक्स वरती देखील जिल्ह्यातील कोणत्याही नेत्यांच्या फोटो नसल्याने वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details