सातारा - नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) याविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला जिल्ह्यातील पाटण, कराडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. व्यावसायिकांनी सायंकाळपर्यंत कडकडीत बंद पाळला. तर फलटण, माण, कोरेगाव, खटाव या भागात तुरळक प्रतिसाद मिळाला.
साताऱ्यात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद - NRC protest in satara
एनआरसी आणि सीएए विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या 'बंद' ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
साताऱ्यात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद
'भारत बंद'च्या पार्श्वभूमीवर बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (29जानेवारी) सकाळी सातारा, माण, कराड, पाटण शहरातून रॅली काढून आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन केले.
बहुजन क्रांती मोर्चा आणि मुस्लीम समाजाचा या मोर्चामध्ये सहभाग होता. बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. व्यापारी वर्गाने या बंदला पाठिंबा दिला नसल्याने सातारा, माण, खटाव, फलटण, लोणंद या भागात बंदचा प्रभाव कमी होता.