सातारा -फलटण तालुक्यातील काळज येथून अपहरण झालेल्या १० महिन्यांच्या बालकाचा मृतदेह विहिरीत सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने बालकाच्या आई-वडिलांना धक्का बसला आहे.
सातारा: अपहृत बालकाचा मृतदेह आढळला विहिरीत... - Phaltan child missing news
फलटण तालुक्यात मंगळवारी अपहरण झालेल्या बालकाचा शोध घेण्यापूर्वी त्याचा मृतदेह सापडला आहे. या गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांना आव्हान ठरणार आहे.
फलटण तालुक्यातील पंढरपूर - पुणे पालखी मार्गावर काळज हे गाव आहे. येथील रामनगर भागात राहणारे त्रिंबक भगत यांच्या १ महिन्याच्या मुलाचे मंगळवारी अपहरण झाले होते. पोलिसांची ८ पथके या बालकाचा शोध घेत होती. लोणंदसह सातारा पोलीस सीसीटीव्ही फुटेजमध्ये काळा शर्ट घालून दुचाकीवर दिसणाऱ्या व्यक्तीचा व त्याच्या मागे बसलेल्या महिलेचा शोध घेत होते. दोन दिवस बालकाचा शोध न लागल्याने ते बालक कोठेही असले तरी सुखरुप असावे, अशी प्रार्थना लोक करत होते. मात्र, आज नको ती भीती खरी ठरली. भगत यांच्या घरापासून काही अंतरावर शेतातील विहरीत त्या बालकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. बालकाच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गेले दोन दिवस मुलाचे अपहरण झाल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू होता. मृतदेह सापडल्याने त्याचे अपहरण कोणी केले ? खून कोणी केला ? नेमके काय झाले ? असा सवाल उपस्थित झाला आहे. घटनेचे गूढ वाढले आहे. या बालकाच्या खुन्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.