महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशाने शिंगणापूर- नातेपुते घाटरस्ता खुला, चार महिन्यांनंतर वाहतूक सुरू - satara road start news

राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई माण तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर प्रसारमाध्यमे यांनी आवाज उठवला होता. लॉकडाऊन नियमात शिथिलता आली असून शासनाने शिंगणापूर-नातेपुते घाटरस्ता सुरू करण्याबाबतची मागणी केली होती. मंत्रीमहोदयांनी तातडीने दखल घेऊन शिंगणापूर घाटरस्ता अत्यावश्यक सेवेसाठी खुला करण्याचे आदेश सोलापूर जिल्हा प्रशासनास दिले होते.

minister shambhuraje desai give order to open natepute shinganapur road
minister shambhuraje desai give order to open natepute shinganapur road

By

Published : Aug 4, 2020, 1:01 PM IST

शिखर शिंगणापूर (सातारा) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेला शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाट अत्यावश्यक सेवेसाठी खुला करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. यानंतर सोलापूर प्रशासनाने शिंगणापूर घाट वाहतुकीसाठी खुला केला आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या जिल्हाबंदी आदेशानुसार सातारा-सोलापूर जिल्हासीमेवरील भवानी घाट सोलापूर जिल्हा प्रशासनाने बंद केल्याने शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील वाहतूक बंद होती. शिंगणापूर घाटातून नातेपुते, अकलूज भागाकडे जाणारी वाहतूक बंद असल्याने शिंगणापूर, मोही, मार्डीसह परिसरातील 10 ते 15 गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. गेल्या आठवड्यात राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई माण तालुक्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर प्रसारमाध्यमे यांनी आवाज उठवला होता. लॉकडाऊन नियमात शिथिलता आली असून शासनाने शिंगणापूर-नातेपुते घाटरस्ता सुरू करण्याबाबतची मागणी केली होती. मंत्रीमहोदयांनी तातडीने दखल घेऊन शिंगणापूर घाटरस्ता अत्यावश्यक सेवेसाठी खुला करण्याचे आदेश सोलापूर जिल्हा प्रशासनास दिले होते.

त्यानंतर सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार नातेपुतेचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज खाडे यांनी शिंगणापूर घाटरस्त्यावरील मातीचे ढिगारे, काटेरी झाडे हटवून नातेपुते घाटरस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे. जवळपास चार महिन्यांनंतर शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील वाहतूक सुरू झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details