महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंवर पाळत ठेवल्याचा संशय; 'त्या' युवकांचा शोध सुरू

राज्याचे ग्रामीणचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडून पायी फेरफटका मारत हाेते. दुचाकीवरुन आलेले दोन युवक चालत असलेल्या मंत्री देसाईचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करीत हाेते. त्यांची हालचाल संशयास्पद आढळून आली. मंत्री देसाईच्या अंगरक्षकाच्या निदर्शनास ही बाब आली. त्याने युवकांना दरडावले. परिणामी युवकांनी तेथून पळ काढला. पुढे जाऊन काही वेळानंतर ते पुन्हा माघारी आले आणि पाेलिसांना पाहताच दुचाकी वेगात नेऊन पसार झाले.

शंभूराज देसाई
शंभूराज देसाई

By

Published : Jun 14, 2021, 7:32 PM IST

Updated : Jun 14, 2021, 7:49 PM IST

सातारा -गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई हे आपल्या निवासस्थानी आहेत. ते सुरक्षित आहे. त्यांच्या विषयी कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. पाेलिसांचा तपास सुरु आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी माध्यमांना दिली आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

काय आहे प्रकरण?

राज्याचे ग्रामीणचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडून पायी फेरफटका मारत हाेते. दुचाकीवरुन आलेले दोन युवक चालत असलेल्या मंत्री देसाईचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करीत हाेते. त्यांची हालचाल संशयास्पद आढळून आली. मंत्री देसाईच्या अंगरक्षकाच्या निदर्शनास ही बाब आली. त्याने युवकांना दरडावले. परिणामी युवकांनी तेथून पळ काढला. पुढे जाऊन काही वेळानंतर ते पुन्हा माघारी आले आणि पाेलिसांना पाहताच दुचाकी वेगात नेऊन पसार झाले. या प्रकाराची माहिती मंत्री देसाई यांनी पाेलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. ज्या भागात मंत्री देसाई फेरफटका मारत हाेते. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. संबंधित युवकांचा शोध सुरू आहे.

दोन कारणांमुळे शक्यता

सातारा पाेलीस दलाने रविवारी रात्री उशिरा गृहराज्यमंत्री देसाई हे घरी सुरक्षित आहेत. काळजीचे कारण नसल्याचे पत्रक प्रसिद्ध करत केले. याबराेबरच पाेलीस या प्रकाराचा कसून तपास करीत असल्याचे म्हटले आहे. शंभूराज देसाई यांनीही पत्रकारांशी बोलताना या प्रकाराचा पुनरुच्चार केला. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार तर नाही ना? या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. दोन कारणांमुळे हे झाले असावं. ती कारणे मी पोलीस अधीक्षकांना सांगितली आहेत. त्या शक्यतांची पडताळणी पोलीस यंत्रणा करेल, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -मराठा आरक्षणावरून उद्रेक होईल - खासदार उदयनराजे भोसले

Last Updated : Jun 14, 2021, 7:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details