महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

छत्रपतींच्या गादीचा अवमान खपवून घेणार नाही - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई - prakash ambedkar statement news

प्रकाश आंबेडकरांसारख्या मान्यवरांनी छत्रपतींच्या वंशजांवर अशा पद्धतीने टीका करणे गैर आहे. आम्हीं ते सातारकर म्हणून किंवा छत्रपतींचे मावळे म्हणून अशा पद्धतीची टीका सहन करणार नाही, अशा शब्दात देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

By

Published : Oct 8, 2020, 5:06 PM IST

सातारा - छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निंदणीय असून, संपूर्ण राज्यात छत्रपतींच्या गादीला मानणारे लोक आहेत. सातारच्या गादीचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. त्यांच्यावरील टीका कदापि सहन केली जाणार नाही, अशा शब्दात राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया

खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात केलेल्या वक्तव्यामुळे साताऱ्यात त्याचे जोरदार पडसाद उमटले. मंत्री देसाई म्हणाले, मराठा आरक्षणा संदर्भात सातारा आणि कोल्हापूरच्या छत्रपतींनी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. असे असताना प्रकाश आंबेडकरसारख्या मान्यवरांनी छत्रपतींच्या वंशजांवर अशा पद्धतीने टीका करणे गैर आहे. आम्हीं ते सातरकर म्हणून किंवा छत्रपतींचे मावळे म्हणून अशा पद्धतीची टीका सहन करणार नाही, अशा शब्दात देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

आरक्षणासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची भूमिका मांडावी. मराठा समाज आपली भूमिका मांडून त्याचा पाठपुरावा शासनाकडे ठामपणे करतो आहे. एकूण आरक्षणाच्या मुद्द्याला दोन्ही छत्रपतींनी त्यांची भूमिका जनतेसमोर ठेवून पाठिंबा दिलेला आहे. असे असताना प्रकाश आंबेडकर का अशी टीका करतात, माहित नाही. परंतू त्यांची ही टीका केवळ सातारकरच नव्हे तर समस्त महाष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही, असे देसाई यांनी बोलताना म्हणाले.

हेही वाचा -सातारा : अजय कुमार बन्सल नवे पोलीस अधीक्षक, तेजस्वी सातपुते यांची बदली

ABOUT THE AUTHOR

...view details