सातारा -तौक्ते चक्रीवादळाचा फटका पाटण तालुक्याला बसला आहे. घरांचे नुकसान झालेल्यांना तातडीची मदत मिळण्याबाबतचा प्रस्ताव पाठवावेत, मी शासनाकडे पाठपुरावा करेन, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.
पाटण तालुक्याला अधिक फटका

चक्रीवादळ व पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील शिरेवाडी, मंद्रुळकोळे, चिबेवाडी, केरळ आदी नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. देसाई म्हणाले, की सातारा जिल्ह्याला नुकताच चक्रीवादळाचा व मुसळधार पावसाचा फटका बसला. याचा परिणाम पाटण तालुक्यात विशेषत: डोंगरी भागात मोठ्या प्रमाणात झाला. वादळी वारे व मुसळधार पावासाने घरांचे पत्रे उडाले, घरांच्या भिंती पडल्या जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे पाईप वाहुन गेले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
'तातडीच्या मदतीचे प्रस्ताव करा'
ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहेत. त्यांना तातडीची मदत देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे करावा. तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी शंभूराज देसाई यांनी सांगितले. यावेळी विविध प्रशाकीय अधिकारी देखील उपस्थित होते.