कराड (सातारा) - कोयना जलाशयातील (Koyna Dam Boating) प्रस्तावित नौकाविहाराच्या जागांची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai inspects Sites) यांनी पोलीस आणि जलसंपदा अधिकार्यांसमवेत लाँचमधून पाहणी केली. पर्यटक व धरणाची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी लवकरच संदर्भातील अहवाल शासनाला सादर करणार आहेत. नौकाविहार सुरू झाल्यानंतर स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
Koyna Dam Boating : कोयना धरणात सुरू होणार नौकाविहार, प्रस्तावित जागांची गृहराज्यमंत्र्यांनी केली पाहणी - कोयना धरण नौकाविहार
कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहाराच्या (Koyna Dam Boating) जागांची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai inspects Sites) यांनी पोलीस आणि जलसंपदा अधिकार्यांसमवेत लाँचमधून पाहणी केली. पर्यटक व धरणाची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी लवकरच संदर्भातील अहवाल शासनाला सादर करणार आहेत. त्यानंतर कोयनेच्या जलाशयात नौकाविहार सुरू होईल.
![Koyna Dam Boating : कोयना धरणात सुरू होणार नौकाविहार, प्रस्तावित जागांची गृहराज्यमंत्र्यांनी केली पाहणी Shambhuraj Desai visit Koyna Dam Boating Sites](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15149690-266-15149690-1651232144013.jpg)
कोयनेच्या पर्यटन विकासाचा सुधारित आराखडा करण्याची सूचना-कोयनानगर येथे वन्यजीव विभाग व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या मंजूर विकासकामांचा आढावा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, प्रांताधिकारी सुनिल गाडे, वन्यजीव विभागाचे उपसंचालक उत्तम सावंत, तहसिलदार रमेश पाटील, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, कोयना धरण व्यवस्थापन विभागाचे उपविभागीय अभियंता आशिष जाधव उपस्थित होते. कोयनानगर परिसरात पर्यटकांना आकर्षित करणार्या स्थळांची मोठी संख्या आहे. त्यापैकी काही पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी प्राप्त झाला असून पर्यटन विकासाचा सुधारित आराखडा लवकरात लवकर तयार करुन मंजूर कामे पूर्ण करण्याची सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकार्यांना केली.
नेहरू उद्यानही कात टाकणार -कोयना धरण परिसराच्या विकासासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. या निधीतून कोयनेतील नेहरू उद्यानातील कामे हाती घ्यावीत. उद्यानात विविध फूलझाडे लावण्यावर भर द्यावा. कोयनानगर परिसरात पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यटन परिचय केंद्र उभे करायचे आहे. या परिचय केंद्राचा चांगला आराखडा तयार करा. त्यासाठी तज्ज्ञ आर्किटेक्चरची नेमणूक करा. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत नेहरु उद्यानाचे सुशोभिकरण, कोयनानगर येथील जुन्या कारंजाचे सुशोभिकरण, कोयनानगर धरण व्यवस्थापनाच्या विश्रामगृहाचे नुतनीकरणाची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे आदेश गृहराज्यमंत्र्यांनी दिले. या कामानंतर नेहरू उद्यान कात टाकणार आहे. पर्यटकांची गर्दी देखील वाढणार आहे.