महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shahi Dussehra Satara : साताऱ्यात पुढील वर्षापासून शाही दसरा; पालकमंत्री शंभूराज देसाईंची घोषणा - Minister Shambhuraj Desai

साताऱ्यात पुढील वर्षापासून शासनाच्या सहकार्यातून शाही दसरा साजरा केला जाणार असल्याची घोषणा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई ( Minister Shambhuraj Desai ) यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath shinde ) यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Minister Shambhuraj Desai Announced Shahi Dussehra
साताऱ्यात पुढील वर्षापासून शाही दसरा - पालकमंत्री शंभूराज देसाईंची घोषणा

By

Published : Oct 7, 2022, 3:31 PM IST

सातारा - साताऱ्याला राजघराण्याची परंपरा असून पुढील वर्षापासून शासनाच्या सहकार्यातून शाही दसरा साजरा केला जाणार असल्याची घोषणा राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. ( Minister Shambhuraj Desai Announced Shahi Dussehra festival celebrated )

मुख्यमंत्र्यांशी चर्चा - साताऱ्यात दरवर्षी दसरा महोत्सव साजरा करण्यात येतो. परंतु, पुढील वर्षापासून शासनाच्या सहकार्यातून भव्य प्रमाणात तो साजरा करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. शाही दसऱ्याच्या नियोजनाबाबत खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले ( MP Udatyan raje bhosale ) यांच्यासोबत मी स्वतः चर्चा करणार असल्याची माहितीही पालकमंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे. ( Guardian Minister Shambhuraj Desai )

जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी - सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि राजघराण्याची परंपरा आहे. ही परंपरा जगासमोर आणण्यासाठी पुढील वर्षीपासून सातारा येथे शाही दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून साताऱ्याला जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न असल्याचे शंभूराज देसाईंनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details