सातारा- सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश झुगारुन खटाव, कोरेगाव तालुक्यातील माळरान परिसरात बेकायदेशीरपणे बिनजोड बैलगाडी शर्यतींचे आयोजन काही दिवसांपासून करण्यात येत होते. यावरती आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती मागवली आहे, तसेच या प्रकरणात कोण कोण आहेत, याची सर्व माहिती दोन दिवसात त्यांच्याकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तसेच लॉकडाऊनमध्ये असे प्रकार कसे घडले? एवढे लोक एकत्र येतात मग आपला गोपनीय विभाग आपला काय करतो..? असा सवाल त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे.
दोन दिवसात बिनजोड बैलगाडा शर्यंत प्रकरणाची माहिती माझ्या कार्यालयात पाहिजे- शंभूराज देसाई - शंभूराज देसाई गृहराज्यमंत्री
पुसेगाव पोलिसांनी एकाच वेळी दोन शर्यतींवर कारवाई केल्या होत्या. मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या मोठं मोठ्या फँन्सी नंबरच्या आलिशान गाड्या व त्यांचे मालक पळून गेले असल्याचे सांगितले गेले होते. तर गुन्हे फक्त सर्वसामान्य लोकांवरती दाखल करण्यात आले होते. त्यावर गृहराज्य मंत्री शभुराज देसाई यांनी माहिती मागवली आहे.
पुसेगाव पोलिसांनी एकाच वेळी दोन शर्यतींवर कारवाई केल्या होत्या. मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या मोठं मोठ्या फँन्सी नंबरच्या आलिशान गाड्या व त्यांचे मालक पळून गेले असल्याचे सांगितले गेले होते. तर गुन्हे फक्त सर्वसामान्य लोकांवरती दाखल करण्यात आले. हा सगळा प्रकार गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या जिल्ह्यातच कसा घडतो. असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. यावरती आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या प्रकरणाची माहिती मागवली आहे.