महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वागतार्ह : लॉकडाऊनसाठी 'या' मंत्र्यांचे योगदान, स्वतःच्या सुरक्षेत कपातीचे उचलले पाऊल - कोरोना प्रसार

राज्याचे सहकार मंत्री पाटील आणि गृहराज्यमंत्री देसाई यांनी आपल्या सुरक्षेमध्ये कपात केली आहे. ती पोलीस सुरक्षा त्यांनी आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी पाठवून दिली आहे. त्यांच्या शासकीय ताफ्यामधील चारपैकी तीन गाड्यांमधील कर्मचारी बंदोबस्ताला पाठवून एकe गाडी आणि पोलीस यंत्रणा त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी ठेवली आहे.

स्वागतार्ह
स्वागतार्ह

By

Published : Mar 27, 2020, 11:59 AM IST

कराड (सातारा) - राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या सुरक्षेमध्ये कपात केली आहे. ती पोलीस सुरक्षा त्यांनी आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी पाठवून दिली आहे. त्यांच्या सुरक्षेतील शासकीय ताफ्यामधील चारपैकी तीन गाड्यांमधील कर्मचारी बंदोबस्ताला पाठवून एकच गाडी आणि पोलीस यंत्रणा त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी ठेवली आहे.

कोरोनाच्या संदर्भात दक्षता घेण्यासाठी सर्वच स्तरांवरून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर सहकार मंत्री पाटील आणि गृहराज्यमंत्री देसाई यांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस बळ जनतेच्या सुरक्षेसाठी दिले आहे. संचारबंदी आणि जमावबंदीच्या बंदोबस्तासाठी त्यांनी हे कर्मचारी पाठवून दिले आहेत. सध्या ते चारपैकी एकाच गाडीतील पोलीस यंत्रणा शासकीय दौऱ्यांसाठी वापरत आहेत. तसेच, दोन्ही मंत्र्यांनी आपले शासकीय दौरेही कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 'लॉकडाऊन' लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांना दिवसाचे चोवीस तास देखरेख करावी लागत आहे. तसेच, घराबाहेर पडणाऱ्यांची कसून चौकशी केली जात असल्याने पोलिसांना प्रत्येक ठिकाणी बारकाईने लक्ष घालावे लागत आहे. देशातील पोलीस दलाचा विचार केल्यास, लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे संख्याबळ बरेच कमी आहे. त्यामुळे त्यांच्यावर आधीच मोठा ताण होता. आता कोरोनाचा फैलाव, संचारबंदी, बंदोबस्त यामुळे हा ताण अधिकच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी स्वतःची सुरक्षा कमी करून जनहिताला प्राधान्य देणे निश्चितच स्वागतार्ह आहे. तसेच, आणखीही मंत्र्यांनी असा स्वतःहून पुढाकार घेणे आवश्यक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details