सातारा - भुईंजच्या किसनवीर साखर कारखान्याची सद्यस्थिती गंभीर असल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढे आले आहे. किसनवीर यांच्या नावाने असलेल्या या सहकारी संस्थेच्या कारभारा विषयी तक्रार येत असेल तर बाब गंभीर आहे. या कारखान्याच्या कारभाराची चौकशी साखर आयुक्तांमार्फत करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
'किसनवीर'च्या कारभाराची चौकशी साखर आयुक्तांमार्फत होणार- सहकारमंत्री पाटील - साखर आयुक्त पुणे
सातारा जिल्ह्यातील किसनवीर साखर कारख्यांन्या बद्दल सभासदांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या कारखान्याच्या कारभाराची साखर आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कारखाना सुरू कऱण्यातबाबतही चर्चा
शेतकऱ्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट-
किसनवीर सहकारी साखर कारखान्याची सद्यस्थिती बिकट असून कारखाना यावर्षी सुरू होईल का नाही, अशी परिस्थिती आहे. या अनुषंगाने आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँक संचालक नितीन पाटील तसेच शेतकरी सभासदांनी शासकीय विश्रामगृहावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली आणि कारखान्यामध्ये सुरू असलेल्या गोंधळाची माहिती दिली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर अनेक सभासदांनी आपली मते मांडली, तर काहींनी कारखाना टिकला पाहिजे, असे पोटतिडकीने सांगितले. यानंतर मंत्री पाटील यांनी सहकारमंत्री म्हणून आपली भूमिका स्पष्ट करत चौकशीचे आदेश दिले.