महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यातील मिनी काश्मीर थंडीने गारठले; पर्यटकांनी अनुभवली गुलाबी थंडी

गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पाचगणी, महाबळेश्वरमध्ये फिरायला आलेले पर्यटक आज दिवसभर सूर्यदर्शन न झाल्याने गारठून गेले. महाबळेश्वरचा पारा आज किमान 13.9 अंशांवर उतरला होता. महाबळेश्वरमधील विल्सन पॉईंटची सनसेट पॉईंट म्हणूनही ओळख आहे. महाबळेश्वरमधील हा एकच पॉईंट असा आहे की, येथून सूर्योदय आणि सूर्यास्तही पाहाता येते. मात्र, ढगाळ हवामानामुळे आज पर्यटकांची मोठी निराशा झाली.

Mahabaleshwar Tourism News  Mahabaleshwar cold news
साताऱ्यातील मिनी कश्मीर थंडीने गारठले

By

Published : Nov 28, 2020, 6:44 PM IST

सातारा - गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पाचगणी, महाबळेश्वरमध्ये फिरायला आलेले पर्यटक आज दिवसभर सूर्यदर्शन न झाल्याने गारठून गेले. महाबळेश्वरचा पारा आज किमान 13.9 अंशांवर उतरला होता.

माहिती देताना पर्यटक

हजारो पर्यटकांची हजेरी

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये विकेंड साजरा करायला आलेले पर्यटक आज गारठून गेले. थंड हवेचे ठिकाण म्हणून मान्यता पावलेल्या महाबळेश्वरमध्ये केवळ उन्हाळ्याच्या दिवसातच पर्यटक येतात असे नव्हे, तर येथील गुलाबी थंडी अनुभवण्यासाठीही पर्यटकांची गर्दी असते. कोरोनाचे सावट देशभर असले तरी पुरेशी काळजी घेत हजारो पर्यटक कालपासून महाबळेश्वरमध्ये दाखल झाले आहेत.

किमान तापमान 13.9 अंश सेल्सीअस

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमध्ये आज कमाल तापमान 18.9 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 13.9 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. महाबळेश्वरमध्ये आज सूर्यच उगवला नाही. सकाळपासून ढगाळ हवामानामुळे सूर्यदर्शन काही झाले नाही. दिवसभर हीच परिस्थिती होती. मात्र, या वातावरणातही वेण्णालेक परिसर, तसेच मुख्य बाजारपेठ गर्दीने फुलून गेले होते. भाजलेली कणसे आणि वाफाळलेल्या चहाचा पर्यटकांनी आनंद घेतला. थंडगार वातावरणात मोठ्यांसह फिरायला आलेली लहान मुलेही उबदार कपडे परिधान करून दिसलीत.

पर्यटकांची निराशा

महाबळेश्वरमधील विल्सन पॉईंटची सनसेट पॉईंट म्हणूनही ओळख आहे. हा १ हजार ४३९ मीटर उंचीचा सिंडोला टेकडीवरील सर्वात उंच पॉईंट आहे. महाबळेश्वरमधील हा एकच पॉईंट असा आहे की, येथून सूर्योदय आणि सूर्यास्तही पाहाता येते. मात्र, ढगाळ हवामानामुळे आज पर्यटकांची मोठी निराशा झाली.

हेही वाचा -महावितरणचा झटका : कराड तालुक्यातील 50 हजारांहून अधिक ग्राहकांना मिळाली थकबाकीची नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details