सातारा - गेल्या 72 वर्षांत कधी नव्हे ते पहिल्यांदाच कोरोना या जागतिक संकटाने प्रत्येक डेपोत शेकडो गाड्या चक्काजाम होऊन थांबल्या आहेत. मात्र, या परिस्थितीतही शासनाने इतर राज्यातील कामगारांना सुरक्षीतपणे त्यांच्या गावी पोहोचवले आहे. सातारा जिल्ह्यातून तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यातील कामगारांनी लालपरीने पोहोचवण्यात आले.
श्रमिकांच्या जीवासाठी 'यूपी, एमपी'पर्यंत धावली सामान्यांची लालपरी... - st bus news
संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा काळात अनेक राज्यातील कामगार अडकून पडले आहेत. मात्र, या कामगारांना सुरक्षीतपणे त्यांच्या गावी पोहोचवले आहे. सातारा जिल्ह्यातून तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यातील कामगारांनी लालपरीने पोहोचवण्यात आले.
साताऱ्यातून परप्रांतीय कामगारांना एसटीने सोडले
'गाव तिथे एसटी' प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन 1 जून 1948 पासून राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस धावते आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने इतर राज्यातील श्रमीक सुरक्षीतपणे त्यांच्या गावी पोहोचावेत म्हणून एसटी ला हाक दिली. एसटीचे सर्व अधिकारी, चालक, वाहक या मोहिमेसाठी तयार झाले. सातारा जिल्ह्याचे एसटीचे प्रमुख सागर पळसुले यांनी आदेश दिले आणि श्रमिकांना घेऊन एसटीने सुरक्षीतपणे त्यांना त्यांच्या प्रांतात, गावी नेऊन सोडले.