म्हसवड : प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांची हातभट्टीवर 'ऑन दि स्पाॅट' कारवाई - satara news
म्हसवडमधील मेरीमाता शाळे शेजारी माणगंगेच्या नदीपात्रात हातभट्टी दारू काढण्याचे काम सुरू असताना अचानक माण खटाव प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी या ठिकाणी अचानक धाड टाकून कारवाई केली.
म्हसवड येथे हातभट्टी तस्करी ठिकाणी कारवाई करताना प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे
सातारा -म्हसवडमधील मेरीमाता शाळे शेजारी माणगंगेच्या नदीपात्रात हातभट्टी दारू काढण्याचे काम सुरू असताना अचानक माण खटाव प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी या ठिकाणी अचानक धाड टाकून कारवाई केली. मात्र त्याठिकाणी दारू काढणारा तेथून फरार झाला आहे. देशभरात सध्या लॉक डाऊन असताना काळ्या धंद्यांना मोठा ऊत आलेला पाहायला मिळत आहे.