महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ज्यांचे कौतुक केले त्यांच्या विरोधातच आज मुख्यमंत्र्यांची सभा - साताऱ्यात मुख्यमंत्री यांची सभा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका व्यक्तीचे तोंडभरून कौतुक केले होते. हाच व्यक्ती आता भाजप उमेदवाराच्या विरोधात निवडणुकीला उभी आहे. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

साताऱ्यात मुख्यमंत्र्यांची सभा

By

Published : Oct 10, 2019, 3:28 PM IST

सातारा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी एका व्यक्तीचे तोंडभरून कौतुक करत होते. ज्या व्यक्तीने आखलेल्या आराखड्यासाठी 500 कोटी रुपयांच्या मंजुरीविषयी ते बोलत होते. ज्या व्यक्तीच्या कामाविषयी मुख्यमंत्री तोंड भरून कौतुक करत आहेत. ती व्यक्ती आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. एवढेच नव्हे, तर मुख्यमंत्री नेतृत्व करीत असलेल्या भाजप उमेदवाराच्या विरोधातच ही व्यक्ती रिंगणात उतरली आहे. ही व्यक्ती भाजप उमेदवारापेक्षाही चांगली आहे. असे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हा कौतुक करणारा व्हिडिओ आता माण खटाव मतदारसंघात चांगलाच व्हायरल झाला आहे.

साताऱ्यात मुख्यमंत्र्यांची सभा

मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेली व्यक्ति प्रभाकर देशमुख हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात देशमुख यांनी जलसंधारण सचिव व कोकण आयुक्त या दोन महत्वाच्या पदांवर काम केले. सचिव असताना देशमुख यांनी जलयुक्त शिवार अभियान ही योजना आणली. देशमुख यांची ही योजना फडणवीस यांनी चांगलीच मनावर घेतली होती. देशमुखांच्या या योजनेचा संपूर्ण महाराष्ट्राला फायदा झाला होता. देशमुख कोकण आयुक्त असताना त्यांनी शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचा विकास करण्याचे मनावर घेतले. या किल्ल्याचा विकास व्हावा म्हणून देशमुख यांनी 500 कोटीचा आराखडा तयार केला होता. त्याला त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ मंजुरी दिली. एवढेच नव्हे तर, रायगड किल्ला विकास प्राधिकरण स्थापन केले. त्यात देशमुखांनाही संधी दिली. देशमुखांच्या या कामाचे मुख्यमंत्री जाहीर कौतुक करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.

आता विधानसभा निवडणुकीत देशमुख हे सातारा जिल्ह्यातील माण–खटाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेले जयकुमार गोरे यांना ते टक्कर देत आहेत. मुख्यमंत्री देशमुख यांचे जाहीर कौतुक करत असलेला हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. यावरती आज देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे देखील पाहणे गरजेचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details