कराड (सातारा) - लेह-लडाख सीमेवर घुसखोरी करणार्या चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत जवान सचिन जाधव यांना वीर मरण आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या दुसाळे (ता. पाटण) या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हुतात्मा जवान सचिन जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - satara latest news
हुतात्मा सचिन जाधव यांचे पार्थिव विशेष विमानाने शुक्रवारी रात्री दहा वाजता पुणे विमानतळावर पोहोचले. तेथून त्यांचे पार्थिव सकाळी तारळे (ता. पाटण) येथे आणण्यात आले. त्याठिकाणी सजवलेल्या वाहनात पार्थिव ठेऊन तारळेपासून दुसाळे गावापर्यंत पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली.
हुतात्मा सचिन जाधव यांचे पार्थिव विशेष विमानाने शुक्रवारी रात्री दहा वाजता पुणे विमानतळावर पोहोचले. तेथून त्यांचे पार्थिव सकाळी तारळे (ता. पाटण) येथे आणण्यात आले. त्याठिकाणी सजवलेल्या वाहनात पार्थिव ठेऊन तारळेपासून दुसाळे गावापर्यंत पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी तारळे पंचक्रोशीतील अबालवृद्धांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्षवृष्टी करून अंत्यदर्शन घेतले. शासनाच्यावतीने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.