महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हुतात्मा जवानाच्या पत्नीचा विनयभंग; पोलीस नणंदेसह तिघांवर गुन्हा दाखल - सातारा क्राइम न्यूज

देशासाठी कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेल्या जवानाच्या पत्नीचे सर्व शासकीय लाभ जबरदस्तीने काढून घेत प्रॉपर्टीतून बेदखल करून तिचा शारीरिक, मानसिक जाचहाट केल्याचा घृणास्पद प्रकार सातारा तालुक्यात घडला. याप्रकरणी पीडित हुतात्मा जवानाच्या पत्नीने बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Martyr Jawans wife molested in satara, FIR registered: borgaon Cops
हुतात्मा जवानाच्या पत्नीचा विनयभंग; पोलीस नणंदेसह तिघांवर गुन्हा दाखल

By

Published : Jan 31, 2021, 8:58 AM IST

सातारा - हुतात्मा जवानाच्या पत्नीचे सर्व शासकीय लाभ जबरदस्तीने काढून घेत प्रॉपर्टीतून बेदखल करून तिचा शारीरिक, मानसिक जाचहाट केल्याचा घृणास्पद प्रकार सातारा तालुक्यात घडला. इतकेच नव्हे तर नणंदेने मित्राकरवी भावजयीचा विनयभंग देखील केला.

याप्रकरणी पीडित हुतात्मा जवानाच्या पत्नीने बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी, पोलीस दलात कार्यरत असलेली नणंद, तिचा मित्र, सासू, व सासरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती तीन वर्षांपूर्वी सीमेवर कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाला. त्यानंतर हुतात्मा जवानाची पत्नी ही सासू, सासरे व दोन लहान मुलांसह तेथेच राहत होती. पोलीस दलात कार्यरत असलेली नणंद वरचेवर घरी येत होती. पती हुतात्मा झाल्यानंतर शासनाकडून व इतर सामाजिक संस्थांकडून मदत म्हणून मिळालेल्या रकमा पीडितेकडून नणंदेने जबरदस्तीने काढून घेतल्या.

जबरदस्तीने घेतले हक्कसोडपत्र
त्यानंतर सासू, सासरे व नणंद यांनी तिला ''तू पांढर्‍या पायाची आहेस. चार वर्षसुद्धा संसार केला नाहीस. माझ्या मुलाला टाळले आणि आता आम्हाला टाळायला बसली आहेस' असे म्हणून सतत तिला शाररिक व मानसिक त्रास दिला. तसेच तिला सातारा तहसीलदार कार्यालयात जबरदस्तीने नेले. तेथे तिच्याकडून वीरपत्नी म्हणून मिळणारे सर्व लाभ, जमीन, पेन्शन याबाबत हक्कसोडपत्र लिहून घेतले.

विनयभंगासाठी संशयितांची फूस
हक्कसोडपत्र लिहून घेतले तरीही घर सोडून जात नाही, हे लक्षात आल्यावर 26 जुलै 2020 रोजी पोलीस दलात कार्यरत असलेल्या नणंदेने तिच्या मित्राला प्लॅन करून घरी बोलावून पीडितेशी शारीरिक संबंध करावे, या हेतूने त्याला मुक्काम करण्यास भाग पाडले. रात्री उशिरा नणंदेच्या मित्राने पीडितेचा विनयभंग केला. याची माहिती तिने सासू, सासरे व नणंद यांना दिली असता 'याबाबत कोठे बोलायचे नाही. नाहीतर तुला घरातून हाकलून देईन' अशी धमकी दिल्याचे पीडितेच्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे करत आहेत.

हेही वाचा -खवल्या मांजर तस्करीप्रकरणी वाईजवळ ५ जण अटकेत; एक फरार

हेही वाचा -महाबळेश्वर येथील महिलेवर अत्याचार; शाहूपुरी पोलिसांत युवकावर गुन्हा

ABOUT THE AUTHOR

...view details